चिपळूण:-घरात घुसून एकाला दोघांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील पेढांबे-भराडेवाडी परिसरात 19 रोजी 5.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी त्या दोघांवर अलोरे-शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रवीण सुरेश आयवळे (पोफळी) याच्यासह एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. तर याची फिर्याद मनोहर दिपाजी मुंढेकर (49, पेढांबे) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर मुंढेकर हे त्याच्या राहत्या घरी एकटेच होते. त्यावेळी प्रवीण आयवळे व याच्यासोबत एक अज्ञात व्यक्ती असे दोघे परवानगीशिवाय मुंढेकर यांच्या घरात घुसले व त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच प्रवीण आयवळे याच्यासोबत आलेल्या त्या अज्ञात व्यक्तीने मुंढेकर यांना शिवीगाळ करुन आजच्या आज जर तक्रार मागे घेतली नाही तुला ठार मारीन, अशी धमकी. या घटनेपकरणी मुंढेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.