पोलीस स्थानकात मुस्लिम समाजाचे निवेदन
मंडणगड:-दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित अटक करावी, अशा मागणीचे पत्र बाणकोट पंचक्रोशी मुस्लिम समाजाच्यावतीने बाणकोट सागरी पोलीस स्थानकात देण्यात आले.
पंचक्रोशीतील मुस्लिम समाजबांधव मंगळवारी हजारोंच्या संख्येने पोलीस स्थानकाबाहेर जमा झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन रामगिरी महाराजांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर मुश्ताक मिरकर, इस्माईल उंडरे, नुरुल्ला परकरा, जलील नुरी, मिरझा नाडकर, हसरत खोपटकर व समाजातील प्रतिनिधींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करत इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावणाऱ्या रामगिरी महाराजांस अटक करावी, अशी मागणी केली आहे.