तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर तालुक्यातील पाचल येथील शिवसेनेचे सर्वसामान्य कार्यकर्ते आत्माराम सुतार यांची उबाठा गटातून हकालपट्टी अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला उत्तर देताना सुतार यांनी आपले म्हणणे मांडले होते. आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहोत, पदाधिकारी नाही, त्यामुळे आमची हकालपट्टी करणे अशा आशयाचे वृत्त म्हणजे अशिक्षितपणा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यावर आत्माराम सुतार यांनी विरोधकांना सडेतोड उत्तरे देत, आपण केलेल्या सामाजिक कार्याचा हवाला त्यांनी दाखवून दिला. यामुळेच मी या पाचल विभागातला बहूजन समाज विकास सरणीचा सामान्य कार्यकर्ता आहे. ही माझी प्रतिष्ठा सामाजिक, राजकीय, व्यावसायिक समाजातील बहूजन समाज विकास सरणीच्या लोकांमुळे मला मिळालेली आहे. ती कोणत्या पक्षामुळे नाही, अस म्हंटल होतं. त्यांच्या कामामुळे तेथील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.
गेले दोन दिवस पाचलमध्ये चाललेल्या या हकालपट्टी नाट्यनंतर शिवसेना शिंदे गटाने या लक्ष घालत सुतार यांनी केलेल्या कामाची आणि लोकांशी असलेली बांधिलकी असलेली पाहता ते सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत, त्यांच्यामुळे अनेक विकास कामांना गती मिळाली हे येथील जनता जाणत आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी म्हणणे म्हणजे अशोभनीय आहे. या वक्तव्यावरून शिंदे गट सुतार त्यांच्या पाठीशी असल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. सुतार यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख शैलेश साळवी, विभाग प्रमुख अमर जाधव, हसन पाटणकर, दीपक सावंत, फिरोज फरास, करीम टिवले, अशफाक प्रभुळकर,देवा पवार, बंडया बामणे,
अशोक वरेकर, सुभाष पवार, सावंत, गुरव यांनी पाचल ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन सुतार यांची सदिच्छ भेट घेतली. यावेळी त्यांच्या पाठीशी शिंदे गट ठामपणे असल्याचे सांगितले.