विद्यालयातील हुशार, होतकरू,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
✍🏻 शिलेश कांबळे भडकमकर
रयत शिक्षण संस्थेचे
“महात्मा गांधी विद्यालय”,साखरपा
या शाळेचे सन २०००-२००१ बॅचचे माजी विद्यार्थी यांचे “स्नेहसंमेलन” १० ऑगस्ट २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाले. त्यानिमित्त या विद्यालयातील हुशार, होतकरू,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करून एक अनोखा शैक्षणीक उपक्रम राबविण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक
शिक्षण महर्षी,शिक्षणाचे महामेरू, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व अगरबत्ती,मेणबत्ती प्रजोलित करून राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. देशासाठी शहीद होऊन मृत्यू झालेले माजी सैनिक, मृत झालेले शाळेतील माजी शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारी व कोरोना काळात मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेचे “महात्मा गांधी विद्यालय साखरपा, दहावी बॅच 2000-2001 ने २४ वर्षांनी एकत्र येऊन सामाजिक भान जोपासून शैक्षणिक उपक्रम राबवून रयत शिक्षण संस्था यांचे महात्मा गांधी विद्यालय, साखरपा मधील *सात विद्यार्थ्यांची* शैक्षणिक पालकत्व जबाबदारी स्वीकारली असून यामध्ये नववी मधील एक विद्यार्थी, सहावी मधील एक विद्यार्थी, व पाचवी मधील पाच विद्यार्थी यांचा सहभाग आहे.
या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षाचे शैक्षणिक साहित्य तसेच, गणवेश, छत्री ,तसेच पूर्ण वर्षाची शालेय आणि बोर्ड फी भरून आदी वस्तूंचे वाटप करून त्यांचे शैक्षणिक पाठबळ देऊन विद्यार्थांचे मनोबल वाढवले. त्यामुळे शाळेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांचे देखील माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. या बॅचसाठी मोलाचे शैक्षणीक योगदान देणारे शिक्षक
आदरणीय श्रीमती नंदा कल्लाप्पा काळुगडे मॅडम
आदरणीय श्री.दिलीप चव्हाण सर(ओंकार क्लासेस)
विद्यमान प्राचार्य श्री.सुरेंद्र आण्णाप्पा कल्लोळे सर
श्री.अनिल दत्तात्रय कांबळे सर
श्री.दीपक वसंत पवार यांचा शाल व श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करून त्यांना *”आदर्श शिक्षक पुरस्कार”* चषक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप लांजा येथे कार्यरत असणारे प्रसिद्ध डॉ.स्वप्निल मांगलेकर (MBBS)यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन साखरपा येथिल प्रसिध्द व अष्टपैलू क्रिकेटपटू श्री.मारूती वाघमोरे यांनी केले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी विद्यार्थी या स्नेह संमेलना निम्मित श्री.शिलेश कांबळे, भडकंबा, यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कठीण परिस्थिती वर मात करून उच्च शिक्षण घ्या.मोठ यश संपादन करून आपण आपल व आपल्या शाळेचं नाव उज्वल करा.तसेच आपण मोठ झाल्यावर समाजाच,शाळेचं ऋण म्हणून आपण सुद्धा जमेल तेवढं सामाजिक योगदान देऊन सहकार्य करा.तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासून योगदान दिले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले. मुंबई येथे कार्यरत असणारे कला शिक्षक यांनी कलेविषयी श्री.नितीन गोरुले यांनी आपले विचार मांडले.
डॉ.देवेंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले. गणेश दत्ताराम शिंदे या माजी विद्यार्थ्यांने शाळेचा गणवेश परिधान करून उपस्थित विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार थोडक्यात मांडले.
तसेच इयत्ता आठवी च्या वर्गाची दूर अवस्था पाहून या माजी विद्यार्थी व “कर्तव्यदक्ष नागरिक” या नात्याने या शाळेला इयत्ता आठवीच्या वर्गा करिता,प्लास्टर, रंग काढण्या व दुरुस्ती करिता आर्थिक मदत म्हणून 25,000/ देणगी देऊन माजी विद्यार्थी संमेलना निमित्त सामाजिक भान ठेवून, ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले त्या शाळेचे आपल्यावर देणं असते.याची जाणिव व भान ठेऊन आपले “शैक्षणिक कर्तव्य”बजाविले.
वृक्षारोपण करण्यासाठी अनेक ठिकाणी रोपे, लहान झाडे यांचे वाटप केले जाते. ग्रामीण आणि शहरी भागातही वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जातात.पावसाळा चालू झाल्यावर वनप्रेमी-निसर्गप्रेमी ‘झाडे लावा झाडे जगवा’, ही मोहीम राबवतात. वृक्षतोड झाल्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी झाडे लावून त्या झाडांना जगविणे ही काळाजी गरज आहे.*”झाडे लावा आणि झाडे जगवा”* या उपक्रमाचा आदर्श ठेवून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी पर्यावरण विषयक जागरूकता म्हणून पर्यावरर्णाचा समतोल राखण्यासाठी या बॅच ने आपल्या शाळेच्या आवारात झाडे लावून एक अनोखा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. यामुळे शाळेतली शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी या बॅच चे आभार मानले.
या बॅच मधील 3
डॉक्टर, 7 इंजिनियर, 2 फार्मासिस्ट, 5 नर्स, 3 शिक्षक , 3 अग्रिकल्चर 6 पोलीस डिग्री ,1नेव्ही अधिकारी 2 हॉटेल व्यवसायिक,10 उद्योजक, 10 सरकारी कर्मचारी, 2 एम. बी.ए,परदेशात मोठ्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थी, आय टी क्षेत्रात उच्च पदाधिकारी, एका विद्यार्थ्यांची स्व:तची कंपनी, तसेच पोलिस प्रशासन , सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत देखिल अनेक पदाधिकारी आहेत.
दिपाली पवार, विजया गुरुपादगोल, शेरबानु बोदले,अमिता शिर्के, क्षमा जठार, संपदा गोरुले,डॉ.स्वप्नील मांगलेकर,ॲड.पराग शिंदे, मारुती वाघमोरे, वैभव मोघे, राकेश शिंदे,महेश राईन,शिलेश कांबळे, गणेश शिंदे, मंगेश शिवगण,पवन जाधव, महेंद्र प्रजापती, कमलचंद मोरे, अजित जाधव, प्रमोद पवार,अजय केतकर, नितीन गोरुले,लक्ष्मीकांत बेर्डे,संजय कामेरकर,निलेश कांबळे,विजय मांडवकर, राकेश मापुस्कर,शशिकांत चव्हाण, गुरुनाथ पांचाळ, महेश माईल, डॉ.देवेंद्र कांबळे, या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थांना मार्गदर्शन करून घडविणारे.श्री.सुधाकर कांबळे,भडकंबा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हुशार,होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप केल्यामुळे या दहावी बॅचचे कौतुक करून आभार मांडले.तुमच्या बॅच चा आदर्श व प्रेरणा घेऊन ईतर ही माजी विद्यार्थी असे अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवतील अशी आपल्या भाषणात अपेक्षा व्यक्त केली.तसेच या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या शैक्षणिक कार्यक्रमाला शाळेतील प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केल्या बद्दल त्यांचे देखील सन २०००-२००१ या दहावी बॅच ने मनःपुर्वक आभार मानले.