चिपळूण : शहरातील बसस्थानकातून एका प्रवासी महिलेचे तब्बल 2 लाख किंमतीचे 4 तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 ते 1 या कालावधीत ही महिला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची वाट पाहत होती. त्यावेळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्या महिलेल्या पिशवीतील पर्समधून 2 लाख किंमतीचे 4 तोळ्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.