चिपळूण : सावर्डे बाजारपेठेत बेकायदा जुगार चालवणाऱ्यावर सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना शनिवारी घडली. त्याच्याकडून 2 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनेश पांडुरंग पोळ (पिंपरी ता. परळी जि.बीड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद रेखा प्रमोद मेश्राम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश पोळ हा गैरकायदा विनापरवाना स्वत:च्या फायद्यासाठी फन ऑन जॉय या लॉटरी खेळातून जुगार चालवत होता. त्याचे आकडे वहीत लिहून तो लोकांकडून पैसे स्वीकारुन होता. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून 2 हजार 310 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.