5780 मीटर सर्वात उंचीची किलीमांजारो शिखर केले सर
सुदर्शन जाधव / खेड:-कोकणच्या जनतेला हेवा वाटावा अस काम खेडच्या एका सुपुत्राने केले आहे. खेड तालुक्यातील मुंबके येथील इमरान फकी यांनी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच 5780 मीटर उंचीवरील किलीमांजारो शिखर सर करत त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला आहे. यापूर्वीचा स्वत: चा विक्रम मोडताना नवा इतिहास राला आहे. या पराक्रमाने त्याने भारताचे नाव सातासमुद्रापार नेले आहे.
इमरान फकी 11 ऑगस्टपासून हे शिखर गाठण्याच्या प्रवासाला निघाले. सकाळच्या सुमारास पावसामुळे अडथळा निर्माण झाला. त्यानंतर मोशी टाऊनमधून खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरूवात झाली. मारांगू गेट येथून मार्गक्रमण करताना आव्हानात्मक रेन फॉरेस्टमधून त्यांना प्रवास करावा लागला. चीखलासह खडतर प्रदेश असतानाही सलग 8 कि.मी.अंतर कापत सायंकाळी 6.30 पर्यंत 2,720 मीटर यांच्यावरील मंदारा हट्सवर येथे ते पोहोचले. दुसऱ्या दिवशी मंदारा झोपड्यावरूनच त्यांनी चढाईला सुरूवात केली.
12.5 मीटर अंतर कापत होरोम्बो हट्स हा 3720 मीटर उंचीचा परिसर पार करत सायंकाळी 4.30 वाजता तेथे पोहाताना दगडांनी खचाखच भरलेल्या पायवाटेतून मार्गस्थ होताना त्यांची दमछाक झाली. थंड वाऱ्यामुळे प्रवास देखील जिकरीचा होता असे त्यांनी सांगतात. 13 ऑगस्ट रोजी होरोम्बो हट्स ते किबो हट्स ही 4720 मीटरपर्यंती 9 कि.मी.ची चढाई करत ते शिखरानजीकच्या बेस कॅम्पवर पोहोचले. जोरदार वारा अन् आव्हानात्मक भूभागामुळे त्यांच्या मार्गात अडथळ्यांचा डोंगर उभा ठाकला होता.
14 ऑगस्ट रोजी सकाळच्या चढाईनंतर शिखर गाठण्याची पूर्ण तयारी करताना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. 15 ऑगस्ट रोजी 5600 मीटर उंचीचे गिलमन पॉईंट हा 9 तासांच्या उभ्या चढाईने सुरू झालेला प्रवास रोमहर्षक अन् तितकाच खडतर होता. उभी चढाई करताना झालेली दमछाक कायम स्मरणात राहील, तसेच हा दिवस देखील तितकाच आव्हानात्मक ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
सरतेशेवटी 5780 मीटर उंचीवरील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच किलीमांजारो शिखर 11 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर केले. त्यानंतर 5895 मीटर उंचावर उभे राहून सकाळी 10.30 वाजता उडुरू शिखरावर पोहोचले. विजयाने हर्षभरीत झालेल्या इमरान फकी यांनी 520 लांब व 4 फूट उंचीचा जगातील लांब भारतीय ध्वज अभिमानाने दक्षिण आफ्रिकेच्या शिखरावर फडकवला. दक्षिण आफिकाया सर्वा शिखरावर तिरंगा फडकवण्यासह राष्ट्रगीत गाताना ऊर भरून आल्याचे ते सांगतात.
भारताचे प्रतिनिधित्व केल्याचा विलक्षण आनंदही तितका होता, असेही ते नमूद करतात. यानंतर ते परतीया प्रवासाला निघाले. शेवटच्या दिवशी होरोम्बो हट्स ते मरांगू गेटपर्यंत 22 कि.मी.अंतराचा नॉनस्टॉप प्र केला. टांझानिया सरकारने कर्तृत्वाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांच्या प्रवासाची सांगता झाली.