गुहागर:-तालुक्यातील आरे श्रीधारदेवी मंदिराजवळील असलेल्या मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममधील 92 हजार रूपये किंमतीच्या तब्बल 24 इर्न्व्हरटर बॅटऱ्या चोरीचा प्रकार सोमवारी घडला होता. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
रोहित पसाद देवकर, (27), सिद्धांत स्वप्नील भोसले, (21, रा. आरेगाव), राहणार आरेगाव, विवेक संतोष मालगुंडकर, (पालपेणे मधलीवाडी) अशी या प्रकरणात अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात गुरूवारी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 15 ऑगस्ट कोणीतरी अज्ञात इसमाने शेल्टर रूमचा दरवाजा हत्याराने उचकटुन काढून चोरून नेल्या. सदर बॅटऱ्याची 92 हजार किंमत असून याप्रकरणी गुहागर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी उपनिरिक्षक सुजित सोनावणे अधिक तपास करत असताना रोहित प्रसाद देवकर, सिद्धांत स्वप्नील भोसले, विवेक संतोष मालगुंडकर यांना अटक केली आहे.