रत्नागिरी:-तालुक्यातील पाली व हातखंबा येथे दारु पिण्यासाठी बसलेल्या दोघांवर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. राजेंद्र संभाजी मालप (रा.निवळी मालपवाडी) व सिद्धनाथ काशिनाथ गराटे (36, रा.पाली गराटेवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र मालप हा 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हातखंबा येथील एका बियर शॉपी समोरील मोकळ्या जागेत दारु पिण्यासाठी बसलेला असल्याचे पोलिसांना आढळून आले, तर सिद्धनाथ गराटे हा पाली गराटेवाडी येथील रस्त्याकडेला झाडाखाली दारु पित असल्याचे पोलिसांना दिसून आले. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या, तसेच त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल केला.