दापोली : दापोली तालुक्यातील हर्णै येथे
मेमन समाजाने 15 ऑगस्ट निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला.
हर्णै गावामध्ये मेमन समाज तर्फे मेमन कॉलनी या ठिकाणी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. हे रक्तदान शिबिर संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आले होते. या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. सुमारे ८० लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला होता. 65 बाटल्या रक्ताच्या डोनेट करण्यात आल्या. यावरून रक्तदान शिबिराचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोकांमध्ये जनजागृती होत असल्याचे दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रेसिडेंट कासम, मेमन व्हाईस प्रेसिडेंट आरफात मेमन व अनाफ मेमन, अरमान अकबानी, नाईम आकबानी यांनी केले होते. इतर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन उपस्थिती दाखवली.