संगमेश्वर : ग्रामपंचायत सरपंच श्री. सुहास मायगडे, उपसरपंच श्री, शोएब भाटकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांचे देश भक्ती पर आधारित कार्यक्रम घेण्यात आले. सर्व प्रथम आंबेड बुद्रुक गावातील माजी सैनिक श्री. नारायण तुकाराम आंबेकर यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्यांनी केलेल्या महान कार्या बद्दल गौरविण्यात आले.
जि. प. केंद्र शाळा आंबेड बुद्रुक नंबर 1, जि. प. आदर्श शाळा आंबेड बुद्रुक नंबर 2 कानरकोन्ड .जि. प. शाळा मानसकोण्ड, जि. प. शाळा आंबेड बुद्रुक नंबर 4 दाभाळवाडी, आणि जि. प. उर्दू शाळा आंबेड बुद्रुक या शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊन समूहगीत, रेकॉर्ड डान्स, भाषणे, वेशभूषा, मानवी मनोरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सादर केले.सर्व शाळांतील विद्यार्थी वर्गाने उत्तम कला सादर केली. मानवी मनोरे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. त्यातील कल्पकता, शिस्त, आणि एकजूट यांचा उत्तम होती. सर्व शाळेतील शिक्षकांनी उत्तम मार्गदर्शन केले.
ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुक यांचा वतीने सर्व सहभागी शाळा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. आंबेड गावातील ग्रामस्थ, पालक यांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. बने मॅडम, केंद्र प्रमुख सौं. नाचणकर मॅडम यांनी स्वातंत्र्य लढ्याबद्दल मनोगत व्यक्त केली. आणि विद्यार्थी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केले.यावेळी ग्रामस्थ श्री. मोहिते यांनी ही देश भक्ती गीत सादर केले.
उपसरपंच श्री. शोएब भाटकर यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सरपंच श्री. सुहास मायगडे यांनी सर्व मुलांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक केले. शाळेतील मुलांना व्यासपीठ मिळावे आणि बालवयापासूनच देशभक्ती, राष्ट्प्रेम वाढीस लागावे. अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी शिक्षक श्री. गमरे, केळकर यांनी ग्रामपंचायतीच्या या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत चे सर्व सन्मा. सदस्य, ग्रामविकास अधिकारी सौ गवंडी मॅडम, पोलीस पाटील श्री. विकास फेपडे, तलाठी श्री. घाग, अनिरुद्ध मोहिते, दिलीप मोहिते तसेच पालक, महिला, शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नथुराम पाचकले यांनी केले.