रत्नागिरी:- आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, मिरकरवाडा मोफत दवाखान्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरकरवाडा नाका येथे उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप, बिपीन बंदरकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभच्छा देऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आरोग्याची सुविधा आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ही सुविधा सक्षमपणे पोहचविण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राचा कमीत कमी वापर झाला पाहिजे. परंतु, याठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुधारण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रातील डॉक्टर घेतील. भविष्यात मिरकरवाडा आणि येथील परिसराच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असा शब्दही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिला.