लांजा:-शहरातील कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंडविरोधात १५ ऑगस्ट रोजी तेथील नागरिक लांजा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले.
या उपोषणाला सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी आणि नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.
नगर पंचायत प्रशासनाने डम्पिंग ग्राउंडबाबत समाधानाकारक भूमिका न घेतल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. कचरा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प वाडीवस्तीलगत असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशी त्यांची मागणी आहे. नगर पंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयात दावा सुरू असताना प्रकल्पाचे भूसंपादन नगर पंचायतीने केले आहे.
जिल्हा समितीने शिफारस केलेले पत्र तसेच अन्य शंकांचे निरसन मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु नगर पंचायत प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिली नाही. उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती परंतु प्रकल्प जबरदस्तीने लादल्याची नागरिकांची भावना आहे.
या उपोषणाला मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर, संतोष कोत्रे, संदीप खामकर, अनिल शिंदे, संजय कोत्रे, श्रीधर साळवी, राजाराम कोत्रे, रामनाथ साळवी, सुहास साळवी, शरद शिंदे, अनिल शिर्के, राजेश सुर्वे, मनोज कोत्रे, पांडुरंग साळवी, श्रीकांत साळवी, रमेश चव्हाण, अशोक आंबेकर, दीपक आडविलकर, प्रणय साळवी, प्रथमेश शिंदे आदी नागरिक बसले आहेत. उपोषणाला प्रमोद कुरूप, मोहम्मद रखांगी, अश्रफ रखांगी, नितीन शेटे, राजेश राणे, श्रीकृष्ण हेगशेट्ये, धनिता चव्हाण, अनिरुद्ध कांबळे, अनंत आयरे यांनी पाठिंबा दिला आहे.