मुंबई:-महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला नसला तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचार प्रमुखपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.
याबाबत कॉंग्रेस हायकमांडच्या स्तरावर विचार सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असणार आहे. प्रचार प्रमुखासंदर्भात अधिकृत घोषणा महाविकास आघाडीकडून झालेली नाही. पण लवकरच होऊ शकते.