एका महिलेसह तिघांना अटक
कुडाळ:-बनावट भारतीय चलनी नोटा छपाई करणाऱ्या टोळीचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकुण १ लाख ३४ हजार ७०० रुपये किंमतीच्या १००, २००, व ५०० रुपयेच्या भारतीय बनावट चलनी नोटा तसच एकुण ३ कलर प्रिंटर आणि त्याचे साहीत्य मिळून एकूण १ लाख ७१ हजार ७०० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर उपस्थित होते.
राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ११,५० वा.चे सुमारास कुडाळ येथील बैंक ऑफ इंडीया शाखा कुडाळ येथील कॅश डिपॉजीट मशीनमध्ये यातील आरोपीत यांनी १०० रुपये दराच्या ९ नोटा, २०० रुपये दराच्या ९ नोटा व ५०० रुपये दराची १ नोट अशा एकूण ३ हजार २०० रुपये किमतीच्या भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या १९ बनावट चलनी नोटा भरणा केलेल्या होत्या. त्याबाबत शाखाधिकारी बैंक ऑफ इंडीया कुडाळ राजेंद्र दिलीप सोनकुसरे यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे आरोपीत यांचेविरुध्द तक्रार दिली होती. त्यावरून कुडाळ पोलीस स्टेशन येथे आरोपित यांच्यावर भा.दं.वि. कलम ४८९(ब), ४८९ (क) प्रमाणे अन्वये दिनांक २८/११/२०२३ रोजी गुन्हा दाखल होता त्याचा तपास चालू होता.
तपासादरम्यान यातील आरोपीत याने कुडाळ येथील बैंक ऑफ इंडीया शाखा कुडाळ येथील कॅश डिपॉजीट मशीनमध्ये डिपॉजीट केलेल्या बनावट नोटा या आरोपीत क्र. ३ निशीगंधा कुडाळकर हिचे खात्यावर डिपॉजीट केलेल्या असल्याचे समजल्याने त्यावेळी आरोपीत क्र. ३ हिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता तीने आरोपीत सुर्या ठाकूर हा आपले पैसे देणे असल्याने त्याने विनाकारण आपले बैंक खात्यामध्ये खेटया नोटा डिपॉजीट केलेल्या असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर गुन्हयातील आरोपीत यांचे ठाव ठिकाण्याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत शोध घेत असता सदर गुन्हयातील मुळ आरोपी सुरेंद्र ऊर्फ सुर्या रामचंद्र ठाकूर (वय ४० वर्षे, रा. पलूस घर नं. ०१. कचरे यांचेकडे भाडयाने, परांजपे वाडयाजवळ, सोनाई हॉस्पीटल, ता. पलूस जि.सांगली,) याचे लोकेशन हे वारंवार मुंबई, पुणे, गोवा, सांगली असे फिरते लोकेशन असल्याने आरोपीत हा मिळून येत नव्हता. त्यामुदतीत आरोपीत याचे लोकेशन हे पलुस सांगली येथे मिळत असल्याने व त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीत यास दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी रोजी पलूस जि. सांगली येथून ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून १, लाख ३४ हजार ७०० रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटा, तसेच चलनी नोटा छपाईसाठी वापरलेला प्रिंटर, कागद असे साहीत्य जप्त करुन ताब्यात घेण्यात आले.
तसेच या गुन्हयाच्या तपासात कुडाळ शहरातील आरोपीत विजय रविकांत शिदे (वय २५ वर्षे, रा. मुळदे, फोजदारवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) व आरोपीत सौ. निशिगंधा उमेश कुडाळकर (वय २५ वर्षे, रा. पिंगुळी राऊळ महाराज मठ जवळ, ता. कुडाळ मूळ रा. वालावल समतानगर, ता. कुडाळ) यांचा देखील गुन्हयामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्हयात अटक करुन आरोपीत यांचे ताब्यातुन बनावट चलनी नोटा छपाईसाठी वापरलेले दोन कलर प्रिंटर जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपीत यांचेकडून एकुण १,३४,७०० रुपये किंमतीच्या १००, २००, व ५०० रुपयेच्या भारतीय बनावट चलनी नोटा तसेच एकुण ३ कलर प्रिंटर व त्याचे साहीत्य मिळून एकूण १,७१,७००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच यापुवों सिधुदुर्ग जिल्हयात घडलेल्या बनावट चलनी नोटा संदर्भात दाखल असलेल्या गुन्हयात वरील आरोपीत यांचा सहभाग आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे.
हि कारवाई ही पोलीस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेष रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाडकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भांड, पोलीस अंमलदार स्वप्निल तांबे, गणेश चव्हाण, प्रित्तम कदम, कृष्णा केसरकर, रुपेश सारंग, संजय कदम यांनी केली आहे, अशी माहिती राजेंद्र मगदूम यांनी दिली.