रत्नागिरी:-तालुक्यातील गोळप डोंगरवाडी येथे उंदिर मारण्याचे विषारी द्रव सेवन केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदेश प्रकाश डोंगरे (33, रा.गोळप डोंगरवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद पुर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश डोंगरे याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून 12 ऑगस्ट रोजी उंदिर मारण्याचे विषारी द्रव सेवन केले. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. सुदेशवर उपचार सुरु असताना सोमवारी रात्री 1.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद करण्यात आली आहे.