खेड:-दापोलीतील तरुणाचा खेडमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील समर्थनगर येथील साई मंदिरानजीक मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आला.
या बाबतची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. खेडमधील हा तरुण नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्टेशन, आणि तालुक्यात चौकशी केली. शर्थीच्या प्रयत्नानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मयूर महेश भांबीड (रा. टेटवली-दापोली) असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. दापोली तालुक्यातील टेटवली गावच्या
तरूणाचा मृतदेह असल्याचे समजले. दापोलीतील तरुण खेड मध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत तर्कवितर्क लढवले जात असून पोलीस तपास करत आहेत. हा तरुण या ठिकाणी कशासाठी आला होता. आणि याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली असेल? तो कोणाच्या संपर्कात होता याचा पोलीस शोध घेत आहेत.