कुडाळ-सावंतवाडीत साधला कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद
कुडाळ:-गाफील राहू नका वैभवला निवडून आणायचे आहे हे लक्षात ठेवा, असा सल्ला ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना कुडाळच्या बैठकीत दिल्याची माहिती मिळतेय.
त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभेसाठीच्या नियोजनाबाबत पदाधिकार्यांशी बंद दाराआड चर्चा केली.
शिवसेना सचिव तथा आ.मिलिंद नार्वेकर यांनी सुरुवातीला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांशी झाराप येथील हॉटेल आराध्या येथे बंद दाराआड चर्चा करण्यात आली. यावेळी सावंतवाडी मतदार संघातील कणकवली जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, बाळा गावडे, रूपेश राऊळ आदिसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांनतर आ.नार्वेकर यांचा ताफा कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस इथं मंगळवारी दुपारी पाऊण वा.च्या सुमारास आला. यावेळी आ.वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस तालुकाप्रमुख अभय शिरसाट, विजय प्रभु यांनी पुष्पगुच्छ देऊन आ.नार्वेकर यांचे स्वागत केले.त्यानंतर शिवसर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आ.नार्वेकर यांनी वन टु वन कुडाळ मालवण मधील प्रमुख पदाधिकार्यांशी थेट चर्चा केली. चर्चेतील तपशील समजू शकला नसला तरी लोकसभा निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो? आता त्यावर कशी उपाययोजना करु शकतो, जेणेकरून त्या भागात आपल्याला विधानसभा निवडणुकीत अधिकचे मतदान होऊन आपला उमेदवार निवडून येईल? याबाबत विचारणा केली.
दरम्यान सावंतवाडी मतदार संघात जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याच सांगुन उमेदवारीची मागणी केली आहे. कुडाळ मतदार संघात तर वैभव नाईक हे विद्यमान आमदार असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे. तरीसुध्दा कुडाळ विधानसभेमधील प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा करून आ. नार्वेकर यांनी परिपुर्ण आढावा घेतला.कुडाळ हा आपला मतदारसंघ आहे,दोन वेळा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत आपला विजयी झालाच पाहिजे, त्यादृष्टीने प्रयत्न करा अशा सुचना आपल्या पदाधिकार्यांना दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी आ. मिलिंद नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
यावेळी शिवसेना उपनेते जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते,आ.वैभव नाईक,माजी उपजिल्हाप्रमुख भाई गोवेकर,विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर,युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, प्रवक्ते मंदार केली, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मंदार गावडे, बाबी जोगी, बबन बोबाटे, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, योगेश धुरी, श्वेता सावंत,दिपा शिंदे,पुनम चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.