रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील बियर शॉपच्या बाजुला दारु पिण्यासाठी बसलेल्या दोघा संशयितांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा. 10 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केल़ी. प्रथमेश प्रमोद देसाई (31) व प्रमोद शंकर आचार्य (32, ऱा रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे 10 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास मारुती मंदिर येथील एका बियर शॉपी बाहेरील जागेत दारु पित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्य़ा अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आह़े. दोन्ही संशयितांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल केल़ा.