खेड : तालुक्यातील सुकिवली येथे 4 महिन्यापूर्वी झालेल्या पोकलेन मशिनच्या साहित्य चोरीप्रकरणी एका संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयिताच्यावतीने ऍड. स्वरूप थरवळ यांनी युक्तीवाद केला.
अरिवाजगन अरुणकुमार (रा. तामिळनाडू) याच्यावर पोकलेन साहित्य चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितास तामिळनाडू राज्यातून अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी जामीन मंजूर केला.