चिपळूण : तालुक्यातील मुंढे येथे 3 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या प्रौढाचा गुरुवारी मृतदेह सापडला. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीराम अनंत शिर्के (48, मुंढे) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम शिर्के हे 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 च्या सुमारास गुरे चरवण्यासाठी गेले असता ते पुन्हा घरी आले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता ते कोठेही सापडलेले नाहीत. या प्रकरणी श्रीराम शिर्के हे बेपत्ता झाल्याची नोंद अलोरे-शिरगाव पोलिसात करण्यात आली होती. शिर्के यांचा शोध सुरु असतानाच गुरुवारी त्यांचा मृतदेह मुंढे परिसरात आढळला. या बाबत अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.