चिपळूण : भरधाव वेगातील कार चालकाने पोफळी येथील एका पुलाच्या कठड्याला धडक देऊन अपघात केल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 च्या सुमारास घडली. या प्रकरणी कार चालकावर अलोरे-शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप रामचंद्र सुर्वे (45) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद अनंत सखाराम कालेकर (62) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत कालेकर यांच्या मालकीची ही कार आहे. संदीप सुर्वे ही कार पुणे ते चिपळूण अशी चालवत होता. तो चिपळुणातील पोफळी पुलाच्या ठिकाणी आला असता त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकली. यात कारचे नुकसान झाले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.