खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात दुसऱ्यांदा अपघात घडला. दारूच्या नशेतील हुंडाई कार चालकाने बोगद्यातील मार्गिका सोडत चालकाच्या बाजूने जावून वॅगनार कारला धडक दिली. अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली.
अपघाताची माहिती मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवत मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. हुंडाई कार चालक समीर सिद्धार्थ मोहिते याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अब्दुल अजीज अब्दुल रहिमान साठी (52) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ते वॅगनार कार (एम.एच 08 ए.एक्स. 1876) घेवून कशेडी बोगद्यातून खेडच्या दिशेने येत होते. बोगद्यातील डाव्या मार्गिकेकडून जात असताना समोरून चालकाच्या बाजूने आलेल्या हुंडाई कार (एम.एच. 02 एक्स. 6208) चालकाने धडक दिली. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे वॅगनार कार चालकाचे म्हणणे आहे. अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहून जखमींना मदतकार्य केले. बोगद्यात वाहतूक खोळंबल्याने यंत्रणांची दमछाक झाली. दोन्ही वाहने बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत होताच वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
कशेडी बोगद्यात मद्यधुंद चालकाची हुंडाई कारला धडक, वाहतूकही खोळंबली
