खेड : तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दारूधंद्यावर पोलिसांनी धाड टाकून 2 लाख 55 हजारांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी रोशन सुभाष भोसले (40) याच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
रोशन भोसले हा अवैधरित्या गावठी हातभट्टीच्या दारूसाठी साहित्यांचा साठा करत गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने धाड टाकली. या धाडीत 27 हजार रूपये किंमतीची 2 हजार लिटर मापाची लोखंडी टाकी, 500 लिटर गूळ नवसागर मिश्रित रसायन, 500 लिटर मापाच्या प्लास्टिकच्या 10 सिंटेक्स टाक्या व 70 लिटर दारू असा 2 लाख 55 हजार रूपये किंमताचा ऐवज हस्तगत केला.