गुहागर:-तालुक्यातील वेळणेश्वर येथील 27 वर्षीय तरुण खलाशाचा रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रात बोटीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजता घडली. सिध्देश शांताराम मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सिद्धेश हा खलाशी म्हणून करंजा रायगड येथील बोट मालक किसन कोळी यांच्या बोटीवर कामाला होता. तो मासेमारीसाठी पूर्वतयारी करायला गेला असताना करंजा-रायगड येथील समुद्र किनारी बोटीतून समुद्रात पडल्याने बुडून मृत्यू झाला. मात्र त्याचा मृतदेह सापडत नव्हता. समुद्राला ओहोटी सुरू झाल्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.