बनावट नोटा प्रकरण
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरण चांगलच गाजत आहेत. या नोटा छपाईचा मास्टर माईंड प्रसाद राणे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीत आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. एमआयडीसीमधील प्रिटिंग प्रेसमध्ये प्रसाद राणे याने मार्च ते जुलै 2024 या कालावधीत एकूण 7 लाख 36 हजार रुपयांच्या 500, 200, 100 च्या बनावट नोटांची छपाई केली. मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासात ही बाब पुढे आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई मानखुर्द येथे बनावट नोटा सापडल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने चार जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत आणखी माहिती समोर आली ती म्हणजे चिपळूण नागरी पतसंस्थेचा व्यवस्थापक अमित कासारचे नाव पुढे आले. कासार याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर कासारच्या चौकशीत या सर्व बनावट नोटांची छपाई रत्नागिरीतील एमआयडीसी येथे प्रसाद राणे आपल्या प्रिंटिंग प्रसेमध्ये करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रसाद राणेच्या घरी धाड टाकून त्याचे प्रिंटिंग मशिन, लॅमिनेशन मशीन आणि कॉम्प्युटर जप्त केले होते.
दरम्यान त्याच्याकडून आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्याला या नोटा छपाईसाठी मोठं कमिशन देण्यात येत होते. 4 लाखांच्या बनावट नोटांच्या छपाईसाठी त्याला तब्बल 1 लाख रुपयांचे कमिशन मिळत होते. यामुळे पैशाच्या हव्यासापोटी राणे रात्रीच्या वेळी
एमआयडीसीतील प्रिटिंग प्रेसमध्ये 500, 200, 100 च्या नोटांची बंडलच छापत होता. या बनावट नोटा जिल्ह्यात वितरीत करण्यासाठी त्याने चिपळूण, खेड येथील तरुणांची मदत घेतली. त्यांनाही मोठ्या कमिशनच आमिष दाखवून या नोटा बाजारात ठिकठिकाणी पोचवण्यात येत होत्या. आता पोलीस आणखी चौकशी करत आहेत. राणे याने हे नोटा छपाईचे मशीन कुठून आणले. त्याला कुणी दिले. आणि त्याला या नोटा छपाईसाठी कोण कमिशन देत होता. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीतील हे बनावट नोटांच प्रकरण रत्नागिरी पुरतं मर्यादित नसून याचा मास्टर माईंड कोणीतरी मोठी व्यक्ती असणार आहे. याशिवाय राणे याने एवढी हिम्मत कशी केली. त्याला हुबेहूब नोटा छपाई कशी काय जमली. ही सारी उत्तरे लवकरच उघड होणार आहेत.