दापोली:-तालुक्यातील केळशी पीरतळा येथे बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी मिलिंद अनंत बागकर (आडेबाजारपेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडे ते केळशी रस्त्यावर केळशी पीर तळा येथे झाडी झुडूपाच्या आडोशाला मिलिंद बागकर संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सुमारे 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू बेकायदा बिगर परवाना जवळ बाळगलेल्या स्थितीत आढळून आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.