रत्नागिरी:-राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायती मधील कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी यांना तसेच ज्या संघटना कामगारांच्या हिताचे करत आहेत, त्यांना राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व लाभ देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. पण तरी देखील आपलेच अधिकारी त्याला हरताळ फासत आहेत. अशा अधिकाऱ्याना जाब विचारण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 पासून कामकाज बंद आंदोलन तसेच 7 ऑगस्ट 2024 रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई ते मंत्रालय मुंबई यादरम्याने लॉंगमार्च काढण्यात येणार आहे.
या आंदोलनसंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही रत्नागिरी दौऱ्यात संघटनेने निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे निमंत्रक डॉ. डि. एल. कराड, ऍड. सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, मुख्य संघटक ऍड. संतोष पवार, ऍड. सुनिल वाळूंजकर आणि समन्वयक अनिल जाधव यांनी 6 ऑगस्ट 2024 पासून कामकाज बंद आंदोलन तसेच 7 ऑगस्ट 2024 रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई ते मंत्रालय मुंबई यादरम्याने लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.