रत्नागिरी:-रत्नागिरीच्या सुप्रसिध्द हॉटेल ‘सावंत पॅलेस’चे मालक शकील सावंत यांना महाराष्ट्राचा बिझनेस टायकुन ॲवॉर्ड 2024 नुकताच पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रसिध्द अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते हा पुरस्कार शकील सावंत यांनी स्वीकारला.
प्रथमच रत्नागिरीत हॉटेल व्यावसायिकाला मोठा पुरस्कार मिळाला आहे. कोकणच्या पर्यटनाला ग्लोबल लुक देण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी शकील सावंत यांनी रत्नागिरीत ‘सावंत पॅलेस’ या अलिशान आणि अत्यंत सुंदर अशा हॉटेलची उभारणी केली आहे. अत्यंत आकर्षक आणि जागतिक दर्जाची रचना, पर्यटकच नव्हे तर स्थानिक नागरीकांनाही अभिमान वाटेल, अशीच या हॉटेलची रचना आहे. विशेष म्हणजे एका सामाजिक जाणिवेतुन त्यांनी जागतिक दर्जाच्या या हॉटेलमध्ये सुमारे 70 ते 80 स्थानिक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष कृतीतुन कोकणचा कायापालट करण्याचा त्यांचा प्रयत्न असुन ‘सावंत पॅलेस’ या भव्य दिव्य हॉटेलच्या माध्यमातुन ते यासाठी कार्यरत आहेत. इथली निवास व्यवस्था, खाद्यपदार्थ, आदरातिथ्य याबाबत जगभरातील पर्यटकांनी अत्यंत चांगले अभिप्राय दिले आहेत. कोकणचे आदरातिथ्य आणि खाद्यसंस्कृती जगभरात लोकप्रिय आहे. त्याचाच अनुभव सावंत पॅलेसमध्ये आल्याशिवाय राहात नाही. शकील सावंत यांच्या याच कार्यामुळे ग्लोबल अवॉर्ड या संस्थेच्यावतीनं बेस्ट हॉटेल इन महाराष्ट्र या विभागात ‘महाराष्ट्राचा बिझनेस टायकुन 2024’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.