दापोली:-तालुक्यातील वेळवी येथे रानात चरण्यासाठी गेलेल्या गाभण म्हैस जमिनीवर पडलेल्या विद्युत भारीत तारेचा शॉक लागून ठार झाली.
सुनिता विलास दळवी यांच्या मालकीची म्हैस त्यांचे पती विलास दळवी हे रानात चरण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी खाली पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श झाल्याने म्हैस जागीच ठार झाली. या म्हशीला वाचवताना विलास दळवी यांनाही विजेचा धक्का लागला. वेळवी सजाचे तलाठी व पोलीस पाटील रेवा झगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. म्हैस 8 महिन्यांची गाभण असल्याने दळवी यांचे 95,000 हजार रुपयांचे नुकसान झाले.