चिपळूण:-पावसामुळे गोठा कोसळून दोन जनावरे ठार झाल्याची घटना नुकतीच कादवड येथे घडली. या पंचनामा झाला असून संबंधितांचे 95 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेले दोन दिवस तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. यामुळे किरकोळ पडझडीचे प्रकार घडले आहेत. कादवड येथील बबन ढवळे यांचा गोठा कोसळून गाभण गाय व पाडी ठार झाली. यामुळे 95 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कळमुंडी येथील सुरेश गुप्ते यांच्या घरावर सरंक्षण भींत कोसळून 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी तालुक्यात 56.77 मि. मी पाऊस पडला. त्यामध्ये मार्गताम्हाने मंडळात 54 मि. मी., सावर्डे 51, वहाळ 42, शिरगाव 76, असुर्डे 48, चिपळूण 58, कळकवणे 79, खेर्डी 55, रामपूर 48 मि. मी. पडला असून आतापर्यंत तालुक्यात 3090.54 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षात झाली आहे.