खेड:-तालुक्यातील लवेल येथील अथर्व पेट्रोल पंपावर वाहनामध्ये 50 लिटर डिझेल भरूनही त्याचे 4,640 रुपयांचे बिल न देताच हुज्जत घालत पलायन करणाऱया 3 अज्ञातांवर गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत अथर्व पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक पद्माकर बाळ गुरव यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या पंपावर एम.एच.04/ए.एल. 2005 क्रमांकाच्या गाडीतून आलेले चौघेजण डिझेल भरण्यासाठी थांबले. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आरती दीपक पडवेकर हिला गाडी डिझेल टाकी फुल्ल करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने 50.30 लिटर डिझेल भरल्यानंतर बिलची मागणी केली. या दरम्यान हुज्जत घालत बिलापोटीचे 4,640 रूपये न देता पलायन केले. याबाबतची तक्रार खेड पोलीस स्थानकात देण्यात आली.