लांजा:-वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तु.पुं.शेटये कनिष्ठ महाविद्यालय वेरवली बुद्रुक येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अरुण डोळे व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यालयातील शिक्षक विनोद बंडगर, सचिन कांबळे, प्रदीप लाड यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बांगर यांनी केले. तसेच मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.