रत्नागिरी:-तालुक्यातील जाकादेवी येथे विवाहित महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. महिमा कैलास सोनावणे (23, रा.जाकादेवी रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिमा ही पती व मुलासह जाकादेवी येथे वास्तव्य करत होती. 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती घरामध्ये दिसुन न आल्याने तिच्या पतीने तिचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घराशेजारी असलेल्या विहिरीमध्ये महिमा हिचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.