ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी करताहेत लाकडी पुलावरून जीवघेणा प्रवास
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चोरवणे गाव अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे आणि या भागात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. दिनांक २१ व २२ जुलै २०२१ रोजी दिवसभर प्रचंड पाऊस पडत होता त्यात प्रचंड मोठमोठी झाडे वाहून येवून ब्रिजला अडकली व पाणी ब्रिजच्या वरून जाऊन ब्रीज पुर्णपणे सरकला गेला आहे.
स्वातंत्र्य काळानंतर १९६० ते १९६२ दरम्यान बांधलेल्या या पुलाची लांबी अंदाजे ५० मीटर व रुंदी तीन मीटर अशाप्रकारे आहे.हा ब्रीज ग्रुप ग्राम पंचायत चोरवणे निवे पंचक्रोशीमध्ये पहिलाच असून चोरवणे गावातील आठ वाड्या उतेकरवाडी, बौद्धवाडी,
गडकरवाडी,शिंदेवाडी, हनुमंतवाडी, डांगेवाडी, सुतारवाडी जखमीची वाडी यांना तसेच तालुका जिल्ह्याला दळण वळण संबंध जोडणारा एकमेव मार्ग. नदीच्या पलीकडे उतेकर वाडी या ठिकाणी शासकीय कार्यालय पोस्ट ऑफिस,ग्रामपंचायत,रेशन दुकान,एसटी स्टॉप,शाळा, हायस्कूल ही सर्व साधने असल्याने रात्रंदिवस या वाटेने ये -जा चालू असते. सध्या नाइलाजास्तव या ब्रीजवरुन जावे लागते शासकीय कर्मचारी अधिकारी येऊन त्याची पाहणी करून छायाचित्र घेवून पंचनामा केलेला आहे.ग्रुप ग्रामपंचायत यांनी यापूर्वीच ठराव घेऊन संबंधित कार्यालय व लोकप्रतिनिधी यांच्याकडे ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे या ब्रिजचे काम पूर्ववत लवकरात लवकर व्हावे अशी आमची चोरवणे ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली होती परंतु जवळजवळ ३ वर्षे होऊन सुद्धा शासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.संपुर्ण जनतेचा स्थानिक आमदार, खासदर आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.