वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या गरीब कुटुंबाला केली आर्थिक मदत!
लांजा/प्रतिनिधी:- लांजा तालुक्यातील खानवली, कालकरवाडी येथील ग्रामस्थ कृष्णा गोविंद कालकर यांचे दि 24/07/2024 रोजी च्या वादळाने घराचे नुकसान झाले होते याची माहिती मिळता जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड यांनी घटनस्थळली जावून कालकर यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, उपतालुका अध्यक्ष विलास चौगुले, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष महमूद पावसकर, प्रथमेश गोरे,समीर दुकले, आदी ग्रामस्थ व पदाधिकारी व कॉँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी काँग्रेस जिल्हा प्रमुख व नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर श्री. अविनाश लाड हे शेतकरी घरातून राजकारणात आले असल्याने त्यांना शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब वर्गाबद्दल कायमच कळवळा राहिलेला आहे व त्यांनी कायमच गोर गरीब जनतेची सेवा केलेली आहे. कोरोना महामारी मध्ये त्यांनी लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघात मास्क वाटप, सैनीटाईजर, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते, तसेच मुंबई येथून डॉक्टरांची विशेष टीम देखील मतदारसंघात आणून रूग्णसेवा केली होती. मतदारसंघातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी देखील श्री. लाड सतत प्रयत्नशील असतात. नवी मुंबई महापालिकेत नगरसेवक व उप-महापौर म्हणून कार्यरत असताना देखील त्यांनी आपल्या राजापूर-लांजा-साखरपा या ग्रामीण भागाशी, आपल्या मातीशी नाळ तुटू दिली नाही.