रत्नागिरी:-जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीतील कोतवडे येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय तरुणाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अमोल अनंत कांबळे (44,रा.बौध्दवाडी कोतवडे,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवार 31 जुलै रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालय येथे घडली.
अमोल कांबळे हे डायबेटिस आजाराने त्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी कोतवडे येथील आपल्या घरी फिनेल प्राशन केले. थोड्या वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना सायंकाळी 6.13 वा. त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.