चिपळूण:-शिक्षण परिषदेची महाराष्ट्र हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात प्रार्थना सादर करुन केंद्राचे खंबीर नेतृत्व करणारे अशफाक पाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपल्या जिल्ह्यात खूप अतिवृष्टी होते. मात्र पाण्याची योग्य प्रकारे निगा न राखल्याने उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते. या साठी आपण पावसाच्या पाण्याची योग्य प्रकारे साठवणूक करणे गरजेचे आहे. छतावरून पडणाऱ्या पावसाचे पाणी जमीनीत खड्डा काढून पाणी जिरवावे.” पाणी आडवा पाणी जिरवा “या नुसार पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडावे. त्यामुळे कूपनलिकेच्या जमीनीत ओलावा कायम राहिल. आणि भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. असे फोफळी हायस्कूल चे शिक्षक इफ्राज पटेल यांनी अनेक उदाहरणासह पटवून दिले .
तंबाकू ने होणाऱ्या आजारां बाबत , तंबाकूच्या व्यसना पासून दूर ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्ना बाबत तसेच तरुण वर्ग आपल्या शारीरिक परिस्थिती ची काळजी कशी घेईल. आणि शालेय परिसरा पासून तंबाकू चे कसे उच्चाटन होऊन विद्यार्थ्यां वर चांगले संस्कार कसे करता येतील. या बाबत सुनील जानवळकर आरोग्य सहाय्यक नगरपालिका चिपळूण यांनी उत्तम प्रकारे अनेक उदाहरणासह माहिती दिली.
पिंपळी उर्दू च्या उप. शिक्षिका आस्माॅ मोमीन यांनी अनेक गोष्टी, अनेक नवनवीन उपक्रमांची तपशीलवार माहिती आणि त्याचे होणारे फायदे या बाबत सखोल माहिती आनंदी वातावरणात दिली.
विद्यार्थ्यांना शालेय आकर्षण वाटून दररोज शाळेत उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात यावेत . शालेय दप्तराचे ओझे कमी करण्यावर भर द्यावे.दर शनिवारी दप्तरा विना शाळा भरुन विविध खेळ , भाषिक खेळ, परिसर भेट, छोट्या मोठ्या उद्योगांना भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच प्रात्याक्षिक मार्गदर्शन करण्या बाबत अभ्यासपूर्ण माहिती एच् . एम्. परकार शाळेचे उप. शिक्षक फय्याज सुर्वे यांनी दिली.
आपल्या जीवनाचे काय ध्येय असावे? या अंतर्गत मिशन माय लाइफ हा उपक्रम सध्या खूप आघाडीवर असून आपण स्वतः, विद्यार्थी, पालक समाज यांनी कशी काळजी घेऊन आपले परिसर, आपले पर्यावरण कसे सुरक्षित राहील. दररोज च्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावून त्या पासून खतनिर्मिती कशी करावी. याची उत्तम माहिती दोणवली उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नासीरमियाॅं दर्वेश यांनी दिली.
शालेय कामकाज आणि शालेय दप्तर अचूक आणि सुस्थितीत ठेवण्या बाबत केंद्रीय प्रमुख अशफाक पाते सर यांनी उत्तम रितीने विषद केले.
शिक्षण परिषदेचे औचित्य साधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मालदोली शाळेचे मुख्याध्यापक मान. अशफाक पटेल सर यांचा चिपळूण तालुक्यातील सर्व उर्दू शिक्षकांच्या वतीने उत्कृष्ट पणे सत्कार करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व उर्दू माध्यमाचे शिक्षक, महाराष्ट्र हायस्कूल चे मुख्याध्यापक इनामदार सर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी तथा महाराष्ट्र हायस्कूल संचालिका मान. नसरीन खडस मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक अशफाक पटेल आणि महाराष्ट्र हायस्कूल चे व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन गट समन्वयक अशफाक पाते सर आणि चिपळूण उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शौकत कारविणकर यांनी केले . अब्दुल कादिर तांबे यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्प देऊन आभार मानले. कार्यक्रमा साठी दूर वरुन शिक्षक वेळीच पोहोचले आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्या बाबत जियाउल्लाह खान यांनी सर्वांचे शाब्दिक आभार मानले.