फुणगुस/इकबाल पटेल:-संगमेश्वर खाडी भागातील फुणगुस गावाचा सुपुत्र अरमान इकलाक खान याने विधी क्षेत्रातील एल.एल.बी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी प्राप्त केली आहे.फुणगुस गावातून पहिला वकील होण्याचा मान देखील त्याने पटकावला आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
फुणगुस मोहल्ल्यातील अरमान खान हा जेष्ठ पत्रकार इकलाक खान यांचा मुलगा आहे.चिपळूण येथील बांदल हायस्कुलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर चिपळूण येथील डीबीजे कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
यावेळी डीबीजे चेअरमन मंगेश तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले,लॉ सीईटी परीक्षेत आपले कौशल्य दाखवत त्याने रत्नागिरी येथील श्रीमान भागोजीशेठ किर विधी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पाच वर्षे अखंड परिश्रम घेत त्याने अंतिम परीक्षेत द्वितीय श्रेणी मिळवत पदवी प्राप्त केली आहे.
त्याच्या या यशाबद्दल आमदार भास्करराव जाधव,आमदार राजन साळवी,शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत,माजी आमदार सुभाष बने,बाळ माने,राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव,शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे,माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत,क्षेत्रप्रमुख बाळा कदम,डीबीजे चेअरमन बाबू तांबे,काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहा,चिपळूण मुस्लिम समाज कार्याध्यक्ष नाझीम अफवारे,मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड.संदेश भोसले,ऍड.बकूल भोसले,ऍड.फारूक म्हातारनाईक यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत.