गुहागर/नरेश मोरे:शाळा…! खरं तर प्रत्येक मानवसृष्टीला संकारात्मक दिव्य दृष्टी बहाल करणारं मुक्त विद्यापीठ शाळा.अज्ञानातून ज्ञानाकडे,असत्यातुन सत्याकडे घेऊन जाणारी तेजोमय अशी पायवाटआहे.खेड्यापाड्यात,वाडी वस्त्यांवर , दुरवरच्या पारावर पशुसमान वाजवल्या जाणाऱ्या माणसांना माणसात आणण्याची प्रक्रिया याच शाळा नावाच्या वर्गातुन सुरू झाली. कधी मोडक्या तोडक्या तर कधी पावसाळ्यात छप्पर गळण्याच्या एखाद्या इमारतीत शाळा भरू लागली. अगदी त्यातुनच कित्येकांना जगण्याचे नवे मार्ग सापडले.
आपली मुले शिक्षण पासून वंचित राहता कामा नये म्हणून शिक्षण क्रांतीची ज्योत प्रज्वलीत करून जिल्हा परिषद शाळा निर्माण केल्या.प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे हेच ध्येय घेऊन चिपळूण तालुक्यातील मौजे मुर्तवडे येथील जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा केरे टोक नं.२ व जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा ढामकोली नं.१ तसेच जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा मुर्तवडे नं.५ , जि.प.प्राथमिक शाळा ढामकोळी नं.२ आदी शाळेतील विद्यार्थ्यांना शंकर कळंबाटे परिवारातर्फे शैक्षणिक साहित्याचे व भेटवस्तू वाटप करण्यात आले.
यामध्ये शिक्षणासाठी लागणारे साहित्य अर्थात कंपास बाॅक्स ,वही ,पेन, पेन्सिल ,डिजिटल वस्तू तसेच आर्थिक स्वरूपात मदत केली. या परिवारातर्फे यथाशक्तीने शक्य झाले तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात ही मुलं स्वबळावरती मोठे बनण्याचा नक्कीच प्रयत्न करतील हेच उद्दिष्ट होतं. नुकताच शनिवार दि.२७ जुलै २०२४ रोजी कार्यक्रम संपन्न झाला.
तो लहान मुलांचा हसरा चेहरा पाहून शंकर कळंबाटे परिवाराला खूप आनंद झाला. विशेष सहकार्य श्री किसन सावंत साहेब, दिनेश कळंबाटे, सचिन राऊत ,जनार्दन कळंबाटे ,नरेश वणगे, आदित्य कळंबाटे, सतिश नावले, बांद्रे साहेब, प्रमोद आगरे, विनायक पाडावे साहेब,प्रतिक्षा शेलार , तृप्ती मांढरे , करिना सातकर यांचे लाभले होते. या कार्यक्रमाला जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा केरे टोक नं२ मुख्याध्यापक श्री सुधिर उकार्डे ,श्री शिवराम भुवड , श्री गणपत तांबे,सौ राजेश्री केंबले ,अंगणवाडी शिक्षिका सौ धनश्री रांबाडे,सौ निर्मळा पवार, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मुर्तवडे नं५ मुख्याध्यापिका सौ दिक्षा पवार,सौ.निधी खामकर अंगणवाडी शिक्षिका सौ अनुष्का शिगवण ,सरपंच श्रावणी भुवड, शाळेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री सचिन भुवड,उपाध्यक्ष सौ दिक्षा निर्मळ,सदस्य ममता निर्मळ,पल्लवी निर्मळ, रागिणी निर्मळ ,जि.प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा ढाकमोली नं १ मुख्याध्यापिका सौ विनीता विनायक पाद्धे,श्री परशुराम देवरुखकर,श्री संजय सुर्वे, श्री आनंद गुजर, सौ.स्वाती घोरपडे आदी उपस्थित होते. उपस्थित व्यक्तीनी शंकर कळंबाटे परिवाराचे आभार मानले.