चिपळूण राष्ट्रवादी आक्रमक
चिपळूण:-सध्या महाराष्ट्रातील कायदा अणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा अणि पोलिस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणुन नवी मुंबईतील अक्षात म्हात्रे ताईंची अणि उरणमधील यशश्री शिंदे ताईंची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या दोन्हीं घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब करणाऱ्या आहेत. या दोन्हीं घटनेतील आरोपींनी अमानवी कृत्य केले असून अत्यंत निघृणपणे अत्याचार करत अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे यांची हत्या केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी चिपळूण तालुका तसेच शहर महिला कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद पवार यांच्या वतीने चिपळूण पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील कायदा अणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी शासनस्तरावर कठोर पावले उचलावीत, जेणेकरून अशा अमानवी निर्घुण कृत्यांना प्रतिबंध करता येईल. तसेच अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून अक्षता ताई अणि यशश्री ताईंच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन आपण अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदेंच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.