रत्नागिरी:-येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राणिशास्त्र विभागातर्फे जागतिक व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने वाघ संरक्षण व संवर्धन या विषयाची प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.
प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांच्या हस्ते प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले.
विज्ञान शाखेच्या प्राणिशास्त्र विभागाकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आरती पाध्ये यांनी प्रास्ताविकामध्ये व्याघ्र दिनाची गरज व महत्त्व मांडले. प्राणिशास्त्राच्या प्रा. तेजल मेस्त्री यांनी याबद्दल मार्गदर्शन केले. प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे एकूण ६ गट सहभागी झाले. यातील तीन गटांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आले.
केवळ व्याघ्र दिवस साजरा करुन न थांबता रोजच्या आयुष्यात ते उपाय राबवावेत, असे प्राचार्य सौ. मधुरा पाटील यांनी नमूद केले. उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, विज्ञान शाखा प्रमुख श्री. घाणेकर, निसर्ग मंडळ प्रमुख सौ. ऋतुजा भुवड व प्राध्यापक विज्ञान व कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रज्वल कळंबटे व आकाश रणसे यांनी केले. आभार प्रदीप भिसे याने मानले.