रत्नागिरी:दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत खड्डयवरून मोठा राडा झालेला असताना आता आणखी एक राडा झाल्याचे समोर येत आहे. रत्नागिरी एमआयडीसी रंगलेल्या पार्टीत एका मोठ्या राजकीय नेत्याला धू धू धूतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पार्टीचे रंग चेहऱ्यावर चांगलेच उलटले आहेत.
श्रावणापूर्वी ओली पार्टी ठेवण्यात आली होती. रविवार सर्व मित्र पार्टी करत होते आणि दारुच्या नशेत एकाने अपशब्द उच्चारला. त्यावरून बाचाबाची झाली. एकमेकाना सावरायला धावले. मात्र नशेत तर्र असलेल्याना अधिकच चढली आणि त्यातूनच सिनेस्टाईल हाणामारी सुरु झाली. जोरदार ओरडा, मारहाणीत एका मित्राने दुसऱ्यावर हात उगारल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि मग त्या दुसऱ्या मित्राचे सहकारी ते देखील समोरासमोर आले. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या साथीदारांना बोलावण्यात आले. यामध्ये एक राजकीय पुढारी सुद्धा पुढे सरसावला. मात्र ओल्या पार्टीने बेभान झालेल्या तरुणांनी राजकीय पुढाऱ्यांचीही चांगलीच धुलाई केली. त्याला एवढे धुतले की डॉक्टरकडे भरती करावे लागले.
यावेळी साधारणपणे ६० ते ७० लोकांची तुंबळ हाणामारी रंगली. रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील रहिवासी देखील या घटनेनंतर बाहेर आले. त्यांनी चांगलेच नेत्रसुख घेतले. त्यानंतर ही घटना रत्नागिरी शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एकाच पक्षाच्या राजकीय पक्षाची ही दारुपार्टी आयोजकालाच महागात पडणार आहे, असे बोलले जात आहे.