रत्नागिरी : शेअर मार्केटच्या गुंतवणूकितून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े. सोम्या कांती नियोगी (ऱा चाफेरी विनायकवाडी रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आह़े. सोम्या यांनी याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध जयगड पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी हर्ष वर्मा नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष वर्मा याने तक्रारदार यांचा मोबाईल नंबर मिळवून तो ‘मार्केट मास्टर्स हब जेओवन’ व्हॉटसऍप ग्रृपमध्ये समाविष्ट करुन घेतल़ा. या ग्रुपवरुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी विविध माहिती देण्यात येत होत़ी या ग्रृपचा ऍडमिन असलेल्या हर्ष वर्मा याने तक्रारदार यांच्या मोबाईल नंबरवर एक लिंक पाठविल़ी तसेच तुमचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे खाते तयार करण्यात आले असल्याचे सांगितल़े. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स लवकर 5 ते 10 टक्क्यांनी वाढणार आह़े, तुम्ही गुंतवणूक केलीत तर मोठा नफा प्राप्त होईल अशी बतावणी केल़ी.
हर्ष वर्मा आपल्याशी खरे बोलत असून गुंतवणूकीतून मोठा नफा मिळेल अशी खात्री तक्रारदार यांना झाल़ी. त्यानुसार तक्रारदार यांनी 23 मे 2024 ते 22 जुलै 2024 या कालावधीत हर्ष याने सांगितल्याप्रमाणे 21 लाख रुपयांची गुंतवणूक केल़ी. केलेल्या गुंतवणूकीतून कोणताही नफा तक्रारदार यांना झाला नाह़ी तसेच याप्रकरणी हर्ष वर्मा याच्याशी तक्रारदार यांनी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाह़ी दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल़े.
तक्रारदार यांनी याप्रकरणी हर्ष वर्मा नावाच्या इसमाने आपली फसवणूक केल़ी अशी तक्रार जयगड पोलिसांत दिल़ी. त्यानुसार पोलिसांनी हर्ष वर्मा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनिमय 2023 चे कलम 318(4) व माहिती तंत्रज्ञान अधिनिमय कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केल़ा यापकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.