उपक्रमात सहभागी होण्याचे सिव्हील सर्जन डॉ. जगताप यांचे आवाहन
रत्नागिरी:-जिल्ह्यात हिपॅटिस बीसीडी जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे या दरम्यान जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय मार्फत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरूवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये विविध संस्था त्याचबरोबर एनएसएस,एनसीसी, स्काऊट गाईड चे विद्यार्थी कृतिशील सहभाग घेणार आहेत,अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ . श्री जगताप यांनी दिली आहे.
सदर जनजागृती पर प्रभात फेरीत रत्नागिरीतील विविध संस्थांबरोबरच नर्सिंग कॉलेज व शिर्के प्रशालेचे स्काऊट – गाईड विभागाचे झांज व ढोल पथक सहभागी होणार आहे . रॅली दरम्यान विविध माहितीपर पत्रके वाटण्यात येणार असून यामध्ये बॅनर्सचे देखील प्रदर्शन केले जाणार आहे. सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमांतर्गत हाय रिस्क डिसीज असलेल्या रुग्णांची विशेष तपासणी करण्यात येणार असून सदर तपासणीचा लाभ इच्छुकांनी इच्छुक रुग्णांनी घ्यावा असे आव्हान डॉक्टर श्री शिरसाट यांनी सिव्हील सर्जन डॉक्टर श्री . जगताप यांच्या वतीने केले आहे .