चिपळूण : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 41 हजार 415 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. आलेले अर्ज मंजूर, नामंजूर करण्याची प्रकिया तालुक्यात सुरू झाली आहे. त्यामुळे ही प्रकिया आता अंतिम टप्यात आली असून त्यानंतर हे अर्ज जिल्हास्तरावरील समितीकडे जाणार आहेत.
महिनाभरापूर्वी शासनाने ही नवी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार लाभार्थी बहीणींना दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत. आता तालुकास्तरावरील समिती या अर्जांची छाननी करीत असून अर्ज मंजूर, नामंजूर करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. त्यानंतर हे अर्ज पुढील मंजुरीसाठी जिल्हास्तरावर जाणार असून त्यानंतर पात्र महिलांया खात्यात जाहीर रक्कम जमा होणार आहे. तर दुसरीकडे नवी नोंदणी सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.