दापोली:-तालुक्यातील दळखण येथून शर्मिला शेखर बांद्रे ही 45 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना रविवारी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मिला बांद्रे या रविवारी संध्याकाळी 6:15 वाजण्याच्या दरम्यान घरातून निघून गेल्या. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिचा परिसरात शोध घेण्यात आला. नातेवाईक तसेच शेजाऱ्याकडे चौकशी केली असता ती कोठेही आढळून आली नाही. म्हणून तिचा मुलगा सुचित बांद्रे याने दापोली पोलीस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानुसार पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद झगडे करीत आहेत.