गुहागर:-गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी वेळंब गावच्या उच्चशिक्षित अपूर्वा बारगोडे यांची नियुक्ती माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी घोषित केली.
त्यांचे पती (कै.) अनंत बारगोडे यांची भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाकरिता वाहून घेण्याची असणारी इच्छा त्या आज पूर्ण करत आहेत. मुलगी डॉक्टर तर मुलगा नोकरीच्या निमित्ताने परदेशात असतो. त्यांचे शिक्षण एलएलबीपर्यंत पूर्ण झाले आहे. कौटुंबिक आघाडीवर सर्व समाधानाने असताना भारतीय जनता पार्टीच्या कामकाजामध्ये वाहून घेण्याची तीव्र इच्छा असल्याने डॉ. नातू यांनी त्यांच्याकडे गुहागर तालुका महिला मोर्चाची जबाबदारी दिली आहे. डॉ. नातू यांनी दिलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन शतप्रतिशत भाजप करण्याच्यादृष्टीने पार पडणार असल्याचे बारगोडे यांनी सांगितले.