जाकादेवी/ संतोष पवार:-शासनाच्या शिक्षण सप्ताहाच्या सामुदायिक सहभाग समूह कार्यक्रमाचे औचित्य साधून तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात सामुदायिक समूह उपक्रमांतर्गत खालगावचे सुपुत्र माजी सैनिक मधुकर उर्फ काका रामगडे यांनी अतिशय निर्भीडपणे पायदल सैनिक म्हणून स्वतःचे जीवन अनुभव आपल्या कथन शैलीत व्यक्त केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्वेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, सहाय्यक शिक्षक अरुण कांबळे , संतोष सनगरे, शिवानंद गुरव, संदीप कुराडे, राहुल यादव,अजिंक्य साळवी सौ. मनिषा धोंगडे, अवधूत जाधव, मंदार रसाळ अनिल पाटील, अमित बोले, किशोर नलवडे यांसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक मधुकर रामगडे यांनी भारताच्या विविध भागांमध्ये आपण सैनिक म्हणून आपले अनुभव कथन करताना देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांची महती, कार्यप्रणाली सांगताना आजच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे, असे सांगून आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. मोबाईल हा प्रगतीच्या आड येऊ नये यासाठी बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी जाऊ नका, अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन माजी सैनिक मधुकर रामगडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी केले.सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी ,तर आभार अमित बोले यांनी मानले.
तद्नंतर शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम माजी सैनिक मधुकर रामगडे यांच्या हस्ते करण्यात आले.या दिनी कौशल्य व डिजिटल दिनानिमित्त तंत्रस्नेही मंदार रसाळ, अनिल पाटील, अवधूत जाधव ,अमित बोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून तंत्रज्ञान व करिअर विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.