लांजा : येथील राष्ट्रीय पंच तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची तेलंगणा या राज्यात होणाऱ्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. तेजस्विनी आचरेकर यांच्या निवडीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
तेजस्विनी या लांजा येथील तायक्वांदो फिटनेस अकॅडमीच्या प्रमुख आहेत. आचरेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तायक्वांदो या प्रकारात यशस्वी झाले आहेत. विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये लांजा येथील खेळाडू सहभागी झाले आहेत. तेजस्विनी यांनी कराटे तायक्वांदो मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तेलंगणा येथे २७ आणि २८ जुलै रोजी ही राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहे.